धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने महाविद्यालयीन स्तरावर आविष्कार -2025 या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक यांनी केले.

 यावेळी प्राचार्य विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगाचे परिक्षण करताना ते म्हणाले, विद्यार्थांने नेहमीच नवनवीन समाजोयोगी संकल्पना असतात, त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक समस्यांवर तोडगा निघतो. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या. हर्बल ड्रग प्रिपरेशन, कोरोना काळात पॅथॉलॉजी लॅबची गरज आणि त्यावर पडलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता ऑनलाइन पॅथॉलॉजी लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. त्यादृष्टीने खेड्यातील शिक्षण पद्धतीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले.

अविष्कार 2025 मध्ये अंडर ग्रॅज्युएट मधील 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवले, दीक्षा विकास मस्के, श्वेता व्यंकटेश कुलकर्णी, गायकवाड राजनंदनी राजेंद्र, सरपणे ओमकार विलास, पवन हनुमंत खुणे, ऋतुजा संतोष दराडे, आस्थासिंग पंकज राजपूत, इंगळे अभिषेक अनिल, थोरात आशिष रंगनाथ, फैजान रफिक शेख, सायली भारत साळुंखे, रयान युसुफ मोमीन,तर पोस्ट ग्रॅज्युएट मधील पाच विद्यार्थ्यांना यश मिळाले, अर्चना बाळासाहेब उदाणे, साकरते ऐश्वर्या, पवार अनुराधा, विद्या नंदकुमार शेलार, अंकिता शिंदे. या सर्व विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे अंतर्गत झोनल लेवल मध्ये निवड झाली आहे. येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी  झोनल लेवल मध्ये अविष्कार 2025 मध्ये भाग घेऊन महाविद्यालयाची महाविद्यालयाचे  नेतृत्व करणार आहेत. अविष्कार 2025 चे समन्वयक व डीन आर. एन डी.डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, डॉ.आर. बी. ननवरे या सर्वांनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथांग परिश्रम घेतले  परिश्रम घेतले.


 
Top