भूम (प्रतिनिधी)- जो महाराष्ट्रातील सत्ता उलटून टाकतो ? उलटू शकतो ? असा सहकारी तुमचा असताना 2024 मध्ये महाराष्ट्रातील 288 पैकी आपल्या मतदारसंघात दोन हजार कोटीचा निधी आणलेला असताना हे जनतेपर्यंत पोहोचू का शकलो नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात संवाद बैठकीत बोलताना केले आहे.
यावेळी दत्ता साळुंके, संजय गाढवे, संयोगिता गाढवे,अण्णासाहेब देशमुख, बाळासाहेब पाटील,बालाजी गुंजाळ,विशाल ढगे,युवराज हुंबे ,विशाल ढगे,अर्चना दराडे,प्रवीण देशमुख,निलेश चव्हाण,ज्ञानेश्वर गीते,रामकिसन गव्हाणे,यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते.
सावंत पुढे बोलताना म्हणाले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना निधी दिला. दोन हजार कोटीचा निधी मंत्री असताना मतदारसंघांमध्ये मंत्रालयातून ताकद वापरून आणला. मी कमी मतांनी निवडून आलो मी नाराज होतो. ज्यांनी गद्दारी केली मी त्यांच्यावर नाराज होतो. शिवसैनिकावर नाराज नाही. आपल्याच लोकांनी गद्दारी केली. जे विरोधक होते त्यांना पक्षात तुम्हीच घेतलं त्यांना निधी दिला त्याच लोकांनी गद्दारी केली. शेतकरी संकटात असताना मी स्वतः मतदारसंघात येऊन सर्वांना कीट साहित्य वाटप केले. सहा कोटी रुपयांची मदत केली. जे आमदार, खासदार येत आहेत त्यांनी फक्त व्हिडिओ शूटिंग काढून लोकांना वाचवले एवढंच केले. मी माझ्या नेत्याला सांगून रेस्क्यू केले. हेलिकॉप्टर बोलावून लोकांचे जीव वाचवले. विरोधकांनी पाच रुपयाची तरी मदत केली का याचे मूल्यमापन झाले पाहिजे.
दोन्ही राष्ट्रवादी एकच
राष्ट्रवादी पक्ष असा आहे सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे वेगवेगळ्या नाहीत असे आमदार तानाजी सावंत यांनी सांगून पार्थ पवार बाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार कुटुंब काहीच प्रतिक्रिया देत नाहीत असा टोलाही लगावला. यावेळी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
