वाशी (प्रतिनिधी)- १०वी १९९३च्या तुकडीचा स्नेह मेळावा ३२वर्षानंतर प्रथमच संपन्न झाला.यावेळी सर्व वर्ग मित्रांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
१९९३ची १०वी ची तुकडी ही विशेष तुकडी आहे.ज्या मध्ये सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असणारे विद्यार्थी होते.जे आज सर्व क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर आहेत.यातील अनेक जण डॉक्टर,इंजिनिअर,वकील,शिक्षक, उद्योजक,नगरसेवक,शेतकरी,व्यापार इयादी क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.सर्वांमध्ये परस्पर सहकार्य, आपुलकीची भावना आहे. आज सर्वानुमते अडचणीच्या काळात एकमेकांच्या मुलामुलींना शिक्षण,आरोग्य, विवाह व अन्य कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर सहकार्य करण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून आनंदात व उत्साहाच्या वातावरणात स्नेह भोजन केले.खेळीमेळीच्या वातावरणात स्नेहमेळावा संपन्न झाला.पुढील मेळावा उन्हाळ्यात घेण्याचे सर्वानुमते ठरले.
