तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने आता पुन्हा ऐकदा महायुती विरुध्द महाविकासआघाडी चुरशीचे लढतीचे संकेत मिळत आहेत .
तुळजापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी सुटताच इछुकांच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सध्या प्रामुख्याने विनोद गंगणे अमोल कुतवळ व माजी नगरसेवक अमर मगर यांचे नाव चर्चेले जात आहे
२०२१ पासून प्रशासकाच्या हाती कारभार
तुळजापूर नगरपरिषदेची मुदत २९ डिसेंबर २०२१ रोजी संपल्यापासून या तीन वर्षांपासून नगरपरिषद प्रशासकाच्या हाती आहे. प्रशासक राज पवार हे सध्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत. नव्या नगराध्यक्षपदाचे पदाचे आरक्षण उत्सुकता संपुष्टात आली आहे . नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली असून, एकूण अकरा प्रभागांमधून २३ सदस्य निवडून येणार आहेत. नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गाला सुटल्याने आता ख-या अर्थाने निवडणुक रणधुमाळीस आरंभ झाली आहे.