तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटी ते सलगरा जाणारा सहा किलोमीटर रस्ता गेली अनेक वर्षापासुन खड्डेमय असल्याने या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामस्थ प्रवाशी व वासनचालकांचे प्रचंड हाल होत असल्याने हा रस्ता तयार करावा अन्यथा या मार्गावरील ग्रामस्थआंदोलन करण्याचा पाविञ्यात आहे तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटी ते सलगरा रस्ता गेली दहा ते बारा वर्षापासुन खड्डे मय या खड्यात वर्षानुवर्षे  वाढ होत आहे पावसाळ्यात या रस्ताची आणखी वाट लागली आहे हा रस्ता दोन तालुक्याला जोडणारा व दहा पंधरा गावाना जाणारा रस्ता आहे.यारस्तावरुन रुग्णांना  नेणे कठीण बनले आहे शालेय विधार्थी ग्रामस्था यारस्ताला वैतागले आहेहा रस्ता तयार करण्याची मागणी वारोवार मागणी   सा बां विभागाला करुन ग्रामथ थकले आहेत पण त्यांना मजुरीसाठी पाठवले म्हणून सांगत निरुत्तर करीत आहे सततकिरकोळ दुरुस्ती केले जात असल्याचे बोलले जात असल्याने या किरकोळ दुरुस्ती वर किती खर्च झाला याची चौकशीची मागणी  ग्रामस्थ करीत आहेत  स्थानिक स्वराज्य निवडणुक पुर्वी रस्ता तयार न केल्यास आम्ही काय करतो ते बघाच असा संतप्त ग्रामस्थांनी दिल्याने सा बां विभागाचे अभियंते दखल घेणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 
Top