भूम (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे ( वय 37 ) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेशेतून मध्यरात्री दि. 06 ऑक्टोंबर रोजी शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सतत पडणारा पाऊस अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .त्यांच्या शेत नदीच्या जवळच असल्याने 3 तीन एकर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना तीन एकर शेती आहे. या नैरेशेतून शेतामधील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई असा परिवार आहे. भूम तालुक्यातून गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या घटनेमध्ये दुसरी घटना असून शेतकरी सतत आत्महत्या करत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करून दुपारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातून ही सलग दुसऱ्या आत्महत्या असून सरकार आणखी किती शेतकऱ्याचे बळी घेणार याबाबत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.


 
Top