भुम (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ सतर्कता जागरुकता सप्ताह, मानवी साखळी दक्षता जागरुकता सप्ताहाचा एक भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर विभागीय कार्यालय अंतर्गत असलेल्या  भूम तालुक्यातील ईट (ता.भूम) शाखांमधील बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे. भारतातील विविध संस्थांमध्ये दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.यामध्ये अनैतिक प्रथांचा प्रतिकार करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जाते तसेच मानवी साखळी आणि प्रतिज्ञा कर्मचाऱ्यांना दिली जाते. दक्षता जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर विभागीय कार्यालयातील सर्व शाखेतील कर्मचारी सदस्यांनी दि.30 ऑक्टोबर रोजी शपथ घेतली. ही शपथ केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देण्यात आली. 'दक्षता आमची सामायिक जबाबदारी' या थीमवर आधारित आहे. हा शपथ समारंभ देशभरात सुरू आहे. ज्याचा उद्देश कर्मचाऱ्यांमध्ये नैतिक आचरण, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा आहे. या द्वारे उपशाखा हरिकृष्ण पाला यांनी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्यास, भ्रष्टाचार रोखण्यास आणि सुशासन पद्धतींना पाठिंबा देण्याविषयी मार्गदर्शन केले गेले. गुरुवारी दि. 30 ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार केली. याद्वारे एकता, अखंडता आणि पारदर्शकतेचा संदेश दिला गेला. या कार्यक्रम प्रसंगी उपशाखा व्यवस्थापक हरिकृष्ण पाला, ऑफिसर योगेश शर्मा, रोखपाल जीतू पवार, लिपिक अमरसिंह सिंग, दप्तरी त्रिशाला सांगवीकर,बँक मदतनीस योगेश चव्हाण,कृषी कर्ज मित्र महावीर जालन व ग्राहक उपस्थित होते.

 
Top