तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील आपसिंगा, काक्रंबा संयुक्त पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लातुर यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, धाराशिव यांना दिले.
वरील विषयास अनुसरून, विषयांकित योजनेची चौकशी करण्याकरीता दि. 19.9.2025 रोजी दुपारी 1:00 वाजता मौजे आपसिंगा ग्रामपंचायत कार्यालय येथे सदरील योजनेच्या चौकशीसाठी उपस्थित राहीलो असता, पाईपलाईनची खोली तपासण्याकरीता चाचणी खडडे घेण्याबाबत सुचि करण्यात आले होते. अद्यापही चाचणी खडडे घेतलेले नाहीत. तसेच आपल्या कार्यालयातील संबंधीत उपविभाग व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी सदरील योजनेच्या चौकशीसाठी आम्हाला योजनेचे अंदाजपत्रक, घेण्यात आलेली मोजमापे व इतर आवश्यक कागदपत्रे उदा. साहीत्य चाचणी अहवाल, पाईपचे त्रयस्थ यंत्रणा तपासणी अहवाल, क्युब टेस्ट अहवाल, ग्रामपंचायतीने योजनेबाबत दिलेली पत्रे, सुचना, जलदाब चाचणी अहवाल व संकल्पन मंजुरी अहवाल इत्यादी. अद्याप उपलब्ध करुन न दिल्यामुळे योजनेच्या चौकशीकरीता विलंब होत आहे.
तरी या पत्राद्वारे कळविण्यात येते की, विषयांकित योजनेतील पाईपलाईनची खोली तपासण्याकरीता चाचणी खडडे तात्काळ घेण्याबाबत संबंधीतांना सुचित करावे. तसेच उपरोक्त नमुद करण्यात आलेली सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. तसेच संबंधीत उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांना सदर योजनेच्या चौकशी करीता सहकार्य करण्याबाबत आपल्या स्तरावरून सुचित करण्यात यावे. या चौकशीच्या कामाकरीता सह चौकशी अधिकारी म्हणून आपल्या विभागातील उपविभागीय अभियंता श्री. एम. एच. कुमठे यांची नेमणुक केली असताना देखील योजनेच्या तपासणी वेळी हे उपस्थित राहीले नाहीत. तसेच त्यांच्याकडून कोण प्रतिसाद मिळत नाही. तरी त्यांना चौकशीच्या कामाकरीता वेळोवेळी उपस्थित राहुन सहकार्य करण्याबाबत सुचना द्याव्यात.असे आदेश ए.एस. पाटील कार्यकारी अभियंता यांनी काढले.
