भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीची आरक्षण सोडत दि. 8 ऑक्टोबर रोजी येथील तहसील कार्यालयातील सभागृहांमध्ये काढण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे, मुख्याधिकारी शैला डाके यांच्यासह नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आरक्षण सोडतीमुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असे वातावरण निर्माण झाले आहे.
भूम नगरपरिषदेच्या 10 प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये काही प्रभागांची आरक्षण सोडत विद्यार्थ्यांच्या हाताने चिठ्ठी काढून काढण्यात आली. अनुसूचित जाती महिला तीन, अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच, सर्वसाधारण सहा, सर्वसाधारण महिला पाच याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले. नगराध्यक्ष सर्वसाधारण महिलेला सुटल्याने निवडणुकीमध्ये घमासान दिसणार आहे. त्यातच काही नगरसेवकांना आपला वॉर्ड आरक्षित पडल्याने निराशा झाली आहे. तर काही ठिकाणी जे अपेक्षित आरक्षण होते तेच पडल्याने भावी नगरसेवकांना सुखकर जाणार आहे.
प्र. क्र. एक अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्र. क्र. दोन सर्वसाधारण महिला, अनुसूचित जमाती, प्र. क्र. तीन सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्र. क्र. चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्र. क्र. पाच अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्र. क्र. सहा सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्र. क्र. सात नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला सर्वसाधारण, प्र. क्र. आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्र. क्र. नऊ सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्र. क्र. दहा जमाती महिला, सर्वसाधारण याप्रमाणे भूम नगरपरिषदेचे आरक्षण सोडत आज जाहीर झाले. यावेळी भूम शहरातील राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेचे गणेश जगदाळे, शशी माळी, तुकाराम माळी, तानाजी नाईकवाडी, प्रकाश गाढवे, आर. डी. तट, आर. एस. मोहिते यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.