धाराशिव (प्रतिनिधी)-  व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील डॉ.व्ही. के. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य मानसिक आरोग्य या विषयावर महाराष्ट्र शासन आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या योगदानातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये डॉ. पूजा कुचेकर यांनी मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, तसेच माणूस कायम चिंतेत असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याचे निराकरण कसे करायचे या बद्दल चे सखोल मार्गदर्शन विद्यार्थी आणि शिक्षकांना केले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य अमरसिंह कवडे,प्रा. तुषार ताकभाते,प्रा. प्रशांत कोरके , प्रा. स्नेहल साखरे, प्रा. काजल काशीद,  सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, कार्यालयीन प्रमुख बालाजी मुंढे ,लिपिक अजित शिनगारे तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य अमरसिंह कवडे यांनी केले.

 
Top