नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील भवानी ग्रुप जगदंबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संघटनात्मक कार्यकर्ते आकाश पुदाले व त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी विजयादशमीनिमित्त दि. 2 ऑक्टोबर रोजी सिमोल्लंघन मैदान येथे भाविकांना 400 लिटर मसाला दुधाचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
दि. 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त नळदुर्ग येथे श्री अंबाबाईची पालखीतुन भव्य मिरवणुक काढली जाते.ही मिरवणुक बसस्थानकाच्या पाठीमागील भवानी नगर येथील पारंपारीक सिमोल्लंघन मैदानात येते. यावेळी याठिकाणी शेकडो आराधी महिलांसह हजारो भाविक उपस्थित असतात. या भाविकांना याठिकाणी थंड पिण्याचे पाणी आणि मसाला दुधाचे वाटप भवानी ग्रुप, जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी करण्यात येते.
