धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील गवळी गल्लीत शतकानू शतकापासून चालत आलेल्या परंपरेनुसार, बा सांस्कृतिक, धार्मिक उत्सव, दीपावलीचा सण पशुपालक व गवळी समाज म्हशी पळवणे आज कार्यक्रमाने साजरा करीत आले आहेत. गवळी समाजातील कारभारी काशिनाथ दिवटे व भीमाशंकर दहीहंडे यांच्या कारभारी, नेतृत्वाखाली म्हशी पळविणे व पशुपालकांचा सन्मान करणे ही परंपरा, आजही तागायत जिवंत ठेवली आहे. म्हशी व रेडा पळविणे स्पर्धा नसून तो पशु पालकाने लक्ष्मी मानलेली आहे. वर्षभर अत्यंत प्रेमाने व स्नेहाने. गुराखी पशुपालक सांभाळ करतात व अशा उत्सवाच्या वेळेस म्हैस व रेडे पळवण्याची कला दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. म्हैस व रेडे यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अंगावर केसातील कापणीने विविध डिझाईन्स काढलेले होते .विविध प्रकारच्या रंगाने संपूर्ण शरीर रंगीत केले गेले होते. मोरपंखाच्या पिसारा व मुरकुजा शिंगामध्ये व गळ्यामध्ये घालून माझा पशु कसा ऐटदार, चांगला व भारदस्त दिसतो.

माझ्या काळी घोंगडी व हाताच्या इशाऱ्यावर कसा पळतो हे दाखविले जात होते.  मोटार सायकलच्या आवाजावर तर कोणीही स्वतः च्या आवाजावर पळवीत होते.रेडे मागच्या दोन पायावर उभे राहणे समोरील पाय उचलून घेणे हे पशुपालक कला दाखवीत होते. दीपावली या सणाच्या उत्सवातून जातीभेद, धर्मभेद,  रंग भेद हे नष्ट झाली पाहिजे व राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे .या उद्देशाने दीपावलीसण साजरा करणे  म्हशी पळविण्यासाठी कुराडे, सुरवसे, कदम ,शेख ,काजी ,शेरकर, पवार, झेंडे ,कांबळे ,वाघमारे, दहीहंडे,  मिसाळ,उपाध्ये  ,खेलगवळी इत्यादींनी सहभाग घेऊन कलादाखिवली. अनेक पशुपालकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व हलगीच्या वाद्यावर जोश पूर्ण सहभाग दाखविला. या कार्यक्रमास प्रा. गजानन गवळी, राजकुमार दिवटे, नंदकुमार हुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज अंजीखाने, श्रीकांत दिवटे, कल्याण गवळी, विश्वास दळवी ,वरूञ साळुंखे ,मुझे मिल पठाण ,वैभव अंजीखाने ,दुर्गेश दिवटे इत्यादींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नागरिक व पशुपालक यांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. शहराच्या लागून असलेल्या ग्रामीण भागातून व तुळजापूर ,सोलापूर, जालना इत्यादी ठिकाणाहून पाहुणेमंडळी व पशुप्रेमी उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये नियोजनामध्ये भालचंद्र हुुच्चे यांंचा मोठा सहभाग असतो .फटाक्याच्या आतषबाजीने  कार्यक्रमाची सांगता झाली.


 
Top