तुळजापूर (प्रतिनिधी)- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलच्या 1993 च्या बॅचचा स्नेहमेळावा रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी “चला पुन्हा एकदा लहान होऊ या,एक दिवसाची शाळा शिकू या,आठवणींचा सोहळा“ हा स्नेहमेळाव्याचा मुख्य संदेश होत संपन्न झाला.
हा स्नेहमेळावा तब्बल 32 वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात भरला होता..या स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी काही जण परदेशातून आलेले होते. शाळेचे माजी विद्यार्थी,विद्यार्थीनी, शिक्षक वृंदांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. तब्बल 32 वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे शाळेचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी गुरूवर्य यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक बदडे, देशमुख, हंगरगेकर, वरपे, भोसले, रोचकरी, मोकाशे, पाटील, किर्गत, सरडे, चव्हाण मॅडम, जाधव मॅडम, शेवाळे मॅडम, पाटील मॅडम, बल्लाळ मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश घोगरे, प्रसाद खामकर, सचिन घोडके, अमोल साठे, प्रशांत हंगरगेकर, ॲॅड.शितल डोके, संगिता धर्माधिकारी यांनी प्रयत्न केले.
