मुरूम ( प्रतिनिधी) - येथील बसव सहकार भवनमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक ग्रंथालय व रोटरी क्लब मुरूम सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने सोमवारी  (ता. ६) रोजी कोजागिरी काव्य मैफिलचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, माजी पोलीस उपनिरीक्षक राम कांबळे, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुंडेराव गुरव यांनी स्वागत गीतातून पाहुण्यांचे स्वागत केले. विविध घटना, प्रसंग, वास्तव जीवनावर आधारित यावेळी कविवर्य सहशिक्षक रुपचंद ख्याडे यांनी प्रीतीचं चांदणं...तुझे सोबत असणे, माझ्यासाठी आहे पुरे, दूर नको जाऊ कधी, मन तुझ्याचसाठी झुरे, सहशिक्षक नागनाथ बदोले यांनी आठवणीतली बाटली...,शिवशरण वरनाळे यांनी दगडाचा देव मानवा तू शोधलास दगडात देव...,कलाप्पा पाटील यांनी आपण सारे पाहू लागलो धो धो पाऊस पडताना कोणीन शेतकऱ्या त्या बांधावरती रडताना...,रक्ताळा !.. रात्रच जणू झाली मृत्यूचा नाच, भिजलेल्या थडग्यात पेटला काच, पावसाचा प्रत्येक थेंब हा पावसाळा, जीव देतो की घेतो ? हा तर रक्ताळा... ही कविता सुनील राठोड यांनी गायली. पत्रकार अजिंक्य मुरुमकर यांनी मृत्यू कधीच जिंकत नाही, मृत्यू सत्य बदलू शकत नाही...,डॉ. नितीन डागा यांनी रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन...अमोल कटके यांनी जगून घ्यावी प्रत्येक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर, एकदा की पडदा पडला की पुन्हा प्रवेश नाही... प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी हिरकणी...गोपनारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत झणी निघाली, पायथ्याशी ते वसे तीचे गाव, घरी जाया मन घेई पार धाव... बाळासाहेब गिरीबा यांनी माणुसकी चा झरा 

दुःख आपल्या वाट्याचा आपणच भोगायच असतं.. कांबळे यांनी हिंदीमधून रचना सादर आदींनी कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निर्मळे, प्रा. शिवाजी राठोड, प्रा. राजकुमार वाकडे, मल्लिकार्जुन बदोले, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे, मनीष मुदकन्ना, शिवशंकर स्वामी, प्रा.भूषण पाताळे, बालाजी व्हनाजे आदिंची विशेष उपस्थिती होती. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, दत्तात्रय इंगळे, राम कांबळे, प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवशरण वरनाळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, कविवर्यांनी सादर केलेल्या कवितेमागे विशिष्ट भावना, अनुभव व विचार असतो. कवितेतील शब्द, प्रतीकं आणि रूपकं यांचा वापर करून कवी त्या भावनांना व्यक्त करत त्यांनी गंधाळलेले शब्द...रंग रूप गंधात शब्द न्हाऊन निघती, शब्द अवतरती शब्दांची बरसात होती माझी कविता... शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा, महांतय्या स्वामी, संतोष मुदकण्णा आदींनी पुढाकार घेतला. या काव्य मैफिलचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी भोसले तर आभार कलाप्पा पाटील यांनी मानले.  

 
Top