परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील पुरग्रस्त झालेल्या मौजे शेळगाव माणिक नगर, खासापुरी येथील वंचित, मजूर दलित घटकातील एकुण 150 गरजू कुटुंबाना जिवन आवश्यक किटचे वाटप करण्यात आले.यामध्ये दैनंदीन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तुंचा समावेश आहे.सदरील किटची मदत मा.मंत्री दिलीप वळसे पाटील व मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील मंचर आंबेगाव यांच्या वतीने करण्यात आली असुन या वाटपासाठी सामाजिक कायकर्ते उमेश सोनवणे,इरफानभाई शेख,मा.प.स.सदस्य गुलाब शिंदे, युवराज कसबे, किशोर हावळे, राजश्री चव्हाण आदिसह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.