भूम (प्रतिनिधी)- अंतरगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत अंतरगाव येथे झालेल्या ग्रामसभे बळजबरी व बाळाचा वापर करून ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती ग्रामसेवकांने केली असल्याची तक्रार अंतरगाव येथील काही ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की ग्रामसभेत ठराव पास होत नसताना सरपंचाने सभा तक केला होता .व सर्व ग्रामसभा सदस्यांचा मताचा विचार न करता ही निवड केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसभेत गावातील 300 उपस्थित असताना फक्त 49 लोकांच्या बहुमतावर नियुक्ती केली .सदर नियुक्ती रद्द करण्यात यावी व पुनर्नियुक्तीसाठी परत ग्रामसभा आयोजित करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
