भूम (प्रतिनिधी)- पंचायत समितीचीच्या सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे सभापतीसाठी अनेकांनी फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे.
भूम तालुक्यामध्ये एकूण दहा गण आहेत. यामध्ये ईट, आरसोली, पाथरुड, माणकेश्वर सर्वसाधारण गटासाठी सुटले आहेत. आष्टा, वालवड, पखरुड हे गण सर्वसाधारण महिलासाठी सुटले आहेत. सुकटा नागरिकांचा मागास प्रवर्ग, चिंचोली अनुसूचित जाती महिला, आंबी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याप्रमाणे दहा गणांमध्ये निवडणूक होणार आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची रस्सीखेच होणार आहे .मागील निवडणूक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस चार पक्ष ,शिवसेना चार,भाजप एक ,काँग्रेस एक अशाप्रमाणे निवडणूक जिंकली होती .मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाने फोडाफोडीचे राजकारण करत शिवसेनेचा सभापती केला होता. आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीतही सर्वच पक्ष निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. मात्र कोणता पक्ष कोणासोबत जाणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही. आष्टा मधून विशाल ढगे, सतीश मातने, भगवान पाटील, माणकेश्वर- बालाजी गुंजाळ, मच्छिंद्र अंधारे, सुदाम पाटील, वालवड- रूक्साना(भाभी) अब्दुल सय्यद, रेखाबाई सोनू राजेजाधव, मिरा दत्तात्रय मोहिते, लक्ष्मी तानाजी पाटील, चिंचोली- ज्योती आडागळे, शुभांगी गायकवाड, गयाबाई नागटिळक, सुकटा भगवान बांगर, बालाजी कुटे, खंडू गोयकर, अण्णा हाके, पंडित मारकड, पाथरुड- चेतन बोराडे,रामकिसन गव्हाणे, वैजनाथ म्हमाने, समाधान भोरे, प्रदिप शेळके, आंबी- प्रियंका गटकळ, जयमाला आतकर,उषा गटकळ, पखरुड गटामधून सर्वच पक्षाची शोध मोहीम सुरू आहे. ईट- बाळासाहेब खरवडे, केशव चव्हाण, सयाजी हुंबे, युवराज हुंबे, सतीश सोन्ने , देवळाली- युवराज तांबे, प्रशांत मुंडेकर, अजित तांबे, बाळासाहेब गपाट, प्रभाकर डोंबाळे तालुक्यातील दहा गणामधून विविध पक्षाकडून पंचायत समिती निवडणूकीसाठी निवडणूक लढवू शकतात.
