तेर( प्रतिनिधी )-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेत भारतरत्न, पद्मविभूषण भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .                   

यावेळी तेर  केंद्राचे केंद्रप्रमुख  अनिल पडवळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी अनिल पडवळ  यांनी आपल्या भाषणामध्ये वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर शिक्षकासह विद्यार्थ्यांनी वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले.  यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विजेत्या गटांना जि. प. कन्या शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे यांच्या  हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यानतर सुरेश नागलबोने यांनी स्वच्छ हात धुणे ची पद्धत प्रात्यक्षिक व गीतासह विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले

 कार्यक्रम  पाडण्यासाठी  अनिल पडवळ,  शिवाजी वाघ ,बाळासाहेब कानडे, सुरेश नागलबोने, दीपक पोद्दार ,  सुनिता माने, जया देवारे ,वर्षा डोंगरे यांनी परीश्रम घेतले.

 
Top