तेर( प्रतिनिधी)- उमेद च्या दशसूत्रीमुळे उमेदचे महीलाच्या उन्नतीसाठी प्रभावशाली कार्य चालू आहे अशी माहिती उमेद च्या प्रेरीका पूजाताई चौहाण यांनी दिली.
उमेद च्या दशसूत्रीमध्ये महीला बचत गटांतील सदस्यांच्या नियमित बैठका घेतल्या जातात.महीला बचत गटातील सदस्य महीला बचत गटाकडे बचत करतात.महीला बचत गटातील सदस्यांना अंतर्गत कर्ज वितरण करण्यात येते.महीला बचत गटातील महिला नियमित कर्जाची परतफेड करत आहेत.महीला बचत गटाचे लेखे अद्यावत ठेवण्यात येतात.महीला बचत गटातील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाते.महीला बचत गटातील महिलांना शिक्षण विषयक जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृतीने बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाते.महीला बचत गटातील महिला पंचायतराज संस्थांबरोबर नियमित सहभाग असतो.महीला बचत गटातील महिला शासकीय योजनांमध्ये नियमित सहभागी होत असतात.महीला बचत गटातील महिलांना शाश्वत उपजिवीकेसाठी विविध शासकीय योजना यांची संपूर्ण माहिती देऊन महीला बचत गटातील महिला यांना प्रवृत्त केले जाते.उमेद च्या दशसूत्रीमुळे उमेदचे महीलाच्या उन्नतीसाठी प्रभावशाली कार्य चालू आहे अशी माहिती उमेद च्या प्रेरीका पूजाताई चौहाण यांनी दिली.
