धाराशिव (प्रतिनिधी)- येथील क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भोसले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
धाराशिव येथील फ्लाइंग कीड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दि. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 14, 17 व 19 वयोगटातील मुलांचे व 17 व 19 वर्ष वयोगटातील मुलींचा संघ प्रतिस्पर्धेच्या संघाला पराभूत करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेला पात्र ठरले आहेत.
हे संघ धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या विजयी संघांस क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे, इंद्रजीत वाले, धीरज लोमटे, प्रज्वल इजारे, रितेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघाचा सत्कार संस्थेच्यावतीने संस्थाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला. तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे ,सुनील कोरडे, श्रीमती बी.बी. गुंड,राजेंद्र जाधव, बालाजी गोरे ,क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण बागल,फाउंडेशन वर्ग प्रमुख विनोद आंबेवाडीकर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
