धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय अविष्कार स्पर्धेत श्रीकृष्ण महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ठ संयोजनाबद्दल प्राचार्य डॉ.गुलाब राठोड यांच्यासह समन्वयक डॉ.राम कदम यांचा गौरव करण्यात आला.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दिवाळीनंतर स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण कल्पना व प्रयोगांना वाव देण्या-या संशोधकांच्या 'आविष्कार'चे आयोजन नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संशोधन व जिज्ञासूवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राजभवनच्या वतीने राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यापूर्वी ही विद्यापीठस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नाटयगृहात शनिवार स्पर्धेचा समारोप व पारितोषिक उद्योजक विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ .गजानन सानप, प्राचार्य भारत खंदारे, 'आविष्कार'चे समन्वयक डॉ.भास्कर साठे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. दोन दिवस या प्रयोगांचे सादरीकरण नाटयशास्त्र विभागातील नवीन सभागृहात झाले . मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी घेण्यात आलेल्या जिल्हा स्पर्धेतून निवडण्यात आलेले सहा गटातून 621 संशोधक स्पर्धेत सहभागी झाले.
जिल्हा यजमानांचा गौरव
युवक महोत्सवाप्रमाणेच अविष्कार स्पर्धा यंदापासून जिल्हानिहाय घेण्यात आली. 10 ते 23 सप्टेंबर या काळात प्रत्येक जिल्हयात करण्यात आले. जिल्हानिहाय हि स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा- मुक्तानंद महाविद्यालय , गंगापूर : 10 सप्टेंबर,जालना जिल्हा- लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर _13 सप्टेंबर, बीड जिल्हा- स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय 18 :सप्टेंबर धाराशिव जिल्हा- श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी , ता. उमरगा: 23 सप्टेंबर या प्रमाणे करण्यात आली. या महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्राचार्य डॉ.रामराव चव्हाण , डॉ भारत खंदारे, डॉ.सुहास मोराळे, डॉ.गुलाब राठोड यांच्यासह आविष्कार समन्वय कडॉ.बी टी पवार , डॉ.राम कदम, डॉ.शैलेंद्र शेलार यांचा समारोपप्रसंगी गौरव करण्यात आला.