वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, यसवंडी, तालुका वाशी येथील शिक्षक दादासाहेब साळुंके यांच्यावर गावातील एका अज्ञात इसमाने शाळेत येवून दगड व विटांनी हल्ला करून जबर मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला.यात सदरील शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उचारासाठी शासकीय रुग्णालय,धाराशिव येथे दाखल करण्यात आले आहे.
तरी मा.तहसीलदार साहेब वाशी यांनी हल्ला करणाऱ्या इसमावर शासकीय कामात अडथळा व इतर गुन्हे नोंद करून योग्य ती कार्यवाही करावी व शिक्षकांना संरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन मंगळवारी दि.7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वाशी तालुका शाखेच्यावतीने वाशी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना देण्यात आले.तसेच या निवेदनाची प्रत माहितीस्तव गट विकास अधिकारी, पं.स.वाशी,गट शिक्षणाधिकारी पं.स.वाशी आणि पोलिस निरीक्षक वाशी पोलिस स्टेशन यांना देण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वाशी तालुका अध्यक्ष संतोष मोळवणे यांच्यासह रणजीत कवडे, आयुब शेख, एस.एम.अंबुरे, एस.पी.सुकाळे, एस.एस.नन्नवरे, बी.पी.माने, आर.के.सरवदे, एस.यू.भांडवले, ए.ए.देवळे, आर.डी.गुंजाळ, एस.व्ही.उंदरे, डब्ल्यू.आर.स्वामी यांच्यासह एकोणतीस शिक्षक व पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.