धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर मनुवदी, सनातनी, देशद्रोही प्रवृत्तीच्या वकिलाने सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला देशद्रोही प्रवृत्तीच्या आझाद समास पक्ष व जिल्हा युनिट धाराशिवच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर हल्ला हा फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर नसून सरळ प्रकारे भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा सनातनी देशद्रोही वकिलावर भारत सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व अशा मानसिकतेच्या लोकांना पाठबळ देणाऱ्या समाज विघातक सनातनी संस्थांची चौकशी करून त्यावर कायम बंदी आणावी असे निवेदन आझाद समाज पार्टीच्या वतीने दि. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर बनसोडे , उपाध्यक्ष अमित सोनवणे, भीम आर्मी तालुका संघटक मनोज शिंदे, अविनाश गायकवाड, विश्वनाथ कांबळे, रणजीत बनसोडे वयास पठाण यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.