तुळजापूर (प्रतिनिधी)-राजकारणाच्या गर्दीतून क्षणभर थांबून “मनुष्यत्वाची दिवाळी” साजरी करण्याचा आदर्शवत उपक्रम तुळजापूर तालुक्यात पाहायला मिळाला. शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी यंदाची दिवाळी राजकीय दिमाखात नव्हे, तर समाजकारणाच्या संवेदनशीलतेने साजरी करत मतिमंद बालकांसोबत दिवाळी साजरी करून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

त्यांच्या या हृदयस्पर्शी संकल्पनेतून धाराशिव येथील स्वआधार मतिमंद बालगृहात फटाके, गोडधोड, ब्लँकेट्स आणि विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या आनंदमयी क्षणी लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून उपस्थित सर्व मान्यवरांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.

या प्रसंगी बोलताना अमोल जाधव म्हणाले, “मतिमंद विद्यार्थी हे आमचे कुटुंब आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे माझे कर्तव्य आणि आनंद दोन्ही आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आनंदाचा दिवा पोहोचवणे हीच खरी दिवाळी.”

या उपक्रमास तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, संजय लोंढे, विकास जाधव, भुजंग मुकेरकर, स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सांगितले. “राजकारण हे तात्पुरते, पण समाजकारण हे कायम टिकणारे. अमोल जाधव यांनी कृतीतून दाखवून दिलं की, सेवा हाच शिवसेनेचा धर्म आहे.”

 
Top