परंडा (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्या झालेल्या परंडा तालुक्यातील महापुरात आवारपिंप्री ,लोहारा, देवगाव, लव्हे,वडनेर, या भागात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड शाखा परंडा यांच्यावतीने अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या मदत कार्याचे वितरण लातूर विभागाचे रिजनल मॅनेजर शिवराज वाघमारे, बार्शी विभागाचे युनिट मॅनेजर गोपीनाथ बगाडे, परंडा शाखा व्यवस्थापक आकाश खुणे, तुषार औसारे, प्रमोद देशमुख, आदित्य कदम, सोहेल सय्यद, दयानंद पवार, अविनाश इटकर,विशाल सुरवसे, मनोज जाधव, यानी केले. महापूरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अनेक पशुधन आणि पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या कठीण प्रसंगी चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि.च्या सामाजिक बांधिलकीतून उचललेले पाऊल कौतुकास्पद ठरले. पूरग्रस्तांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि.चेआभार मानले.
