भूम (प्रतिनिधी)-  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूम येथील उपोषण करते हभप सतीश कदम महाराज यांच्या उपोषण ठिकाणावरून शेतकरी पुत्रांवर गुन्हे का दाखल केले .असे दूरध्वनी वरून पोलीस निरीक्षकांना विचारले असता खासदारांचा फोन कट केला. व कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर न दिल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकाराचा हक्क भंग केल्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांना पत्राद्वारे खुलासा मागवला आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्याचा सात बारा कोरा करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावा यासाठीतालुक्यातील आष्टा येथील हभप सतीश महाराज कदम हे  दि. 03 ऑक्टोंबर पासून उपोषणाला बसले आहेत.  या उपोषणाला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येऊ लागल्याने शहरातील माजी नगर अध्यक्ष संजय गाढवे, विजयसिंह थोरात यांच्या सह शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्ता रोको करून आंदोलन केल्याने. पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी जमावबादी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे सदरील आंदोलनकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवत दोन माजी नगराध्यक्ष यांच्या सह 70 ते 80 शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद केला होता. 


.

पोलीस निरीक्षकाच्या विरोधात थेट हक्कभंगाचा आरोप 

भूम चे पोलीस निरीक्षक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दूरध्वनीद्वारे केलेला प्रकाराबद्दल खासदार यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण एक जबाबदार अधिकारी असताना जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्षित करीत आहात. मी धाराशिव लोकसभेचा सदस्य असल्याने पोलीस निरीक्षकांनी लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यामुळे माझ्या अधिकार व हक्कांचा भंग झाल्याची भावना झाली आहे. असे पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यावर काय खुलासा करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 
Top