नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील पालिकेत आज झालेल्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीमध्ये दहा महिला तर दहा पुरुष अशा जागा सुटलेले असून यामध्ये अनुसूचित जाती जमाती यासाठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, दरम्यान या सोडतीमध्ये काहींना आनंद झाला असून काही जण आता काय करायचे या मनस्थितीमध्ये अडकून राहिले आहेत. 

प्राधिकृत अधिकारी अरुणा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.या मध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याकडून सुट्टी काढून अनुसूचित जाती, त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा आरक्षित करण्यात आल्या, यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये एकूण पाच जागा आरक्षित केल्या असून यामध्ये तीन महिला दोन पुरुष, तर अनुसूचित जाती जमाती साठी तीन जागा आरक्षित केल्या असून यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष अशा जागा आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय सर्वसाधारण जागेमध्ये एकूण पाच महिला तर सात परुष अशा जागा शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक एक मध्ये 1 अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर 1 ब सर्व साधारण गटासाठी जागा सुटली आहे. तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये 2 अ अनुसूचित जाती पुरुष व ब मध्ये सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक तीन मध्ये 3 अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व ब ही जागा सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक चार मध्ये 4 अ सर्व साधारण महिला, ब सर्व साधारण गटासाठी, तर प्रभाग पाच मध्ये 5 अ ही जागा सर्व साधारण महिला ब मध्ये सर्व साधारण गटासाठी सुटली आहे, प्रभाग क्रमांक सहा मध्ये 6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर ब ही जागा सर्व साधारण गटासाठी, प्रभाग क्रमांक सात मध्ये 7 अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ब ही जागा सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक आठ मध्ये 8 अ ही जागा अनुसूचित जाती महिला तर ब ही जागा सर्व साधारण गटासाठी सुटली आहे, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये 9 अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर ब ही जागा सर्व साधारण गटासाठी, तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये 10 अ ही जागा अनुसूचित जाती महिला तर ब ही जागा सर्व साधारण गटासाठी सुटली आहे, दरम्यान अनुसूचित जाती साठी दोन महिला एक पुरुष, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन महिला दोन पुरुष अशा जागा आरक्षित झाले आहेत, तर तर एकूण 20 जागे पैकी बारा जागा या सर्वसाधारण गटासाठी शिल्लक राहिले असून त्यामध्ये पाच महिला राखीव राहिले आहेत.

 
Top