धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हयासाठी 24 नविन सबस्टेशनला आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून जिल्हयाची वाढती विज मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करणेकरीता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून आशियाई विकास बँकेने 24 नविन 33/11 के. व्ही सबस्टेशन उभारणीकरीता आशियाई विकास बँकेकडे प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती दिली आहे. 

वारंवार विज पुरवठा खंडीत होणे, अनियमीत विद्युत पुरवठा, लोड शेडींग, या समस्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून ऐन हंगामात शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात विद्युत तुटवडयाच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात घेवून सातत्याने व सुरळीतपणे विद्युत पुरवठा करणेकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर.डी. एस.एस. व आशियाई विकास बँक तसेच मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी या विविध योजनेंतर्गत विद्युत पुरवठा सुरळीत करणेकरीता प्रयत्न केले आहेत.

 

येथे होणार सबस्टेशन

याचाच भाग म्हणून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून जिल्हयात 24 नविन सबस्टेशन करीता धाराशिव तालुक्यातील पळसप, दारफळ, भडाचीवाडी वरुडा चौक, गोगाव -करजखेडा  तसेच तुळजापुर तालुक्यातील ढेकरी, वडगाव काटी, नविन तामलवाडी, कार्ला खंडाळा  लोहारा तालुक्यातील तुगाव, वडगाव (गांजा) ,खेड, उमरगा तालुक्यातील नाईचाकुर, कुन्हाळी, कराळी, भुम तालुक्यातील गिरवली फाटा, वंजारवाडी, नळीवडगाव, कळंब तालुक्यातील नायगाव, खोंदला चोराखळी परांडा तालुक्यातील खासापुरी, ताकमोडवाडी, जवळा येथे नविन सबस्टेशन होणार आहेत


येथे होणार क्षमतावाढ

तसेच सध्यस्थितीतील 20 सबस्टेशनची क्षमतावाढ करुन त्या ठिकाणी अतिरीक्त, 5 एम.व्ही.ए. ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून तुळजापुर तालुक्यातील फुलवाडी (10 एम.व्ही.ए), वसंतनगर, बारुळ, होर्टी, उमरगा तालुक्यातील माडज येथे तसेच भुम तालुक्यातील आंबी, वाशी तालुक्यातील पारा, परांडा तालुक्यातील जवळा, पिंपळगाव, सोनारी सुकटा वरदवाडी, कळंब तालुक्यातील ढोराळा, डिकसळ, रायगव्हाण धाराशिव तालुक्यातील रुईभर, तडवळा, काकडे प्लॉट  येथे अतिरीक्त 5 एम.व्ही.ए. पावर ट्रान्सफार्मर बसवण्यात येणार आहेत.


 
Top