धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमनगर येथे शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांचे दलित चळवळीतील योगदान आणि बंद पडलेली चळवळ याविषयी व्याख्यान संपन्न झाले. यावेळी उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चार दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सायंकाळी प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांनी दलित चळवळीतील योगदान आणि बंद पडलेली चळवळ या विषयावर उपस्थितांना व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक कमलाकर बनसोडे, धनंजय वाघमारे, अनिल बनसोडे, मिलींद डावरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी केले. तर आभार सुभाष सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास झेंडे, अविनाश शिंगाडे, सुमित चिलवंत, प्रसेजनजित शिंगाडे, यशवंत शिंगाडे, जितेंद्र बनसोडे, महेंद्र जेटीथोर, दिलीप सोनवणे, बंटी शिंगाडे, संतोष वाघमारे, विकी नाईकवाडी, प्रमोद ढवळे, प्रशांत कांबळे, सम्राट कांबळे, सम्राट वाघमारे, विजय उंबरे, प्रवीण सोनवणे, रणजित माळाळे, यश माळाळे, उमेश खंदारे, सुरेश देवकुळे, बापू साबळे, सारिपुत शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास भीमनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.