धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.11 ऑक्टोबर रोजी अवैध मद्य विरोधी 21 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 770 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 467 लि. गावठी दारु, 257 सिंधी ताडी अम्ली द्रव व 197 देशी विदेशी दारुच्या बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1 लाख 30 हजार 250 रूपये आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 21 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) भुम पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) गिताबाई रमेश काळे, वय 40 वर्षे या 08.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) राणी धनाजी काळे, वय 30 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता. भुम धाराशिव या 08.45 वा. सु. आपल्या राहत्या घराचे बाजूस 130 गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
2) उमरगा पथकाने 8 ठिकाणी छापे टाकले. यात आरोपी नामे- दत्ता गंगाराम थोरात, वय 66 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे 11.20 वा. सु. शिवाजी चौक गुंजोटी येथे गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) चांदु सुभाष शिंदे, वय 23 वर्षे, रा. याकतपुर रोड औसा ह.मु. बिरुदेव मंदीर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 10.30 वा. सु. त्रिकोळी जाणारे रोड शेजारी 200 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव प्लॉस्टिकचे बॅरेल सह अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 3) नितीन लक्ष्मण माने, वय 42 वर्षे, रा. चिंचोली ज. ता. उमरगा जि. धाराशिव हे 12.20 वा. सु.हॉटेल प्रभातच्या पाठीमागे मोकळ्या जागेत 45 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 4) नामदेव रमेश तेलंग, वय 35 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.40 वा. सु.आपल्या राहत्या घराचे बाजूस 12 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 5) मारुती बाबुराव पवार, वय 34 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.00 वा. सु.माडज गावातील प्रेमनाथ महाराजाच्या मंदीराकडे जाणारे रोडच्या बाजूला 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 6) खासीम मकबुल लदाफ, वय 36 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा. ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु.हॉटेल प्रभातच्या पाठीमागे मोकळ्या जागेत 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 7) शिवराज गोविंद कांबळे, वय 45 वर्षे, रा. गौतमनगर उमरगा. ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.20 वा. सु.भाजी मार्केट येथील पत्र्याचे शेड शेजारी उमरगा येथे पाठीमागे मोकळ्या जागेत 55 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 8) निर्मला सुग्रीव चव्हाण, वय 61 वर्षे, रा. जकेकुरवाडी तांडा. ता. उमरगा जि. धाराशिव या 19.10 वा. सु.जकेकुरवाडी तांडा येथे 27 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
3) आनंदनगर पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) सारिका दशरथ राठोड, वय 28 वर्षे, या 19.30 वा. सु. शिंगोली तांडा मधील शुभमचिकनचे दुकानाजवळ देशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 2) सविता भगवान पवार, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी सांजा ता. जि. धाराशिव या 18.00 वा. सु. पारधी पिढी सांजा येथे 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
4)धाराशिव ग्रामीण पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात अंबेजवळगे ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) कृष्णा रामा चांदणे, वय 49 वर्षे,हे 10.35 वा. सु. कौडगाव येथील बेडकीनाल्यावरील पुलाजवळ देशी विदेशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे 1) भिमराव भगवान गोफणे, वय 45 वर्षे, हे 11.45 वा. सु. गुंजेवाडी ते भानसगाव जाणारे रोडवर भानसगाव चौक लगत देशी विदेशी दारुच्या 51 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
5)लोहारा पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) नागनाथ मारुती सोनटक्के, कानेगाव ते आरणी जाणारे रोडलगत जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे 2)देवानंद संगापृपा ढगे, वय 36 वर्षे, रा. पेठसांगवी ता. उमरगा धाराशिव हे 11.50 वा. सु. पेठसांगवी गावातील भिमनगर मध्ये 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
6)स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यात टाकळी ता. परंडा ह.मु. बाणगंगा साखर कारखाना परीसर ईडा ता. भुम जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) आशाबाई मोहन पवार, वय 40 वर्षे, या 12.45 वा. सु. हॉटेल रायबाचे समोर रोडचे बाजूला पत्र्याचे शेडसमोर ईडा येथे 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळतिश्रीत रासायनिक द्रव व 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 2)बल्लु बिच्छवा काळे, वय 55 वर्षे, रा. पारधी पिढी तेर ता. जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. पारधी पिढी तेर येथील असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये 190 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 3)रमेश देवराव पवार, वय 51 वर्षे, रा. पारधी पिढी तेर ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. पारधी पिढी तेर येथील असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे 4)रणजित दत्तात्रय गाताडे, वय 26 वर्षे, रा. रांजनगाव ता. गंगापूर जि.छ. संभाजीनगर ह.मु. मुगाव ता. परंडा जि. धाराशिव हे 15.45 वा. सु. सोनारी ते अंबी जाणारे रोडवरील हॉटेल भैरवनाथ चे बाजूला देशी विदेशी दारुच्या 47 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
6) धाराशिव शहर पो ठाण्याचे पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव येथील- आरोपी नामे 1) कुणाल अनिल पवार, वय 30 वर्षे, हे 18.45 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 45 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.