कळंब (प्रतिनिधी)- चोरी चपाटी करून तर कोणी गैर मार्गाने आर्थिक कमावण्याच्या प्रयत्नाचा असतो सध्याचे युगात कोणाशी एखादी वस्तू किंवा ऐवज सापडले असल्यास परत करण्यात पुढे येत नाहीत. परंतु कळंब येथील एका महिला वाहकाने मोठ्या किमंतीचा सापडलेला मोबाईल त्या प्रवाशास परत केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.10 ऑक्टोबररोजी सकाळी 6 सुमारास कळंब आगरातून कळंब सोलापूर ही गाडी गर्दीने खच्चा खच भरून धाराशिव येथे गेली यावेळी बस मधले सर्व प्रवासी आपापल्या वाटेने मार्गस्थ झाले बस संपूर्ण रिकामी रिकामी झाली सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर महिला वाहक निवेदिता रणदिवे यांना मोठया किमतीचा सायलेंट असलेला मोबाईल आढळून आला .
कळंब सोलापूर हे कर्तव्य करत असताना बस क्रमांक 14 9515 बस मध्ये सोलापूर तुळजापूर प्रवास करत असलेल्या प्रवासी राकेश कुमार राहणार कर्नाटक यांचा मोबाईल बस मध्ये पडला व तो महिला वाहक सौ निवेदिता रणदिवे यांना सापडला त्यांनी सदर प्रवाशाला संपर्क साधत तुमचा मोबाईल माझ्याजवळ आहे. तेव्हा तो तुळजापूर बस स्थानकावरून घेऊन जावे असे सांगितले. सदर महागडा मोबाईल वाहतूक नियंत्रक तुळजापूर यांच्या समक्ष प्रवाशास सुपूर्त केला.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.