तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर अश्विनी  पौर्णिमेचा सोहळा आई तुळजाभवानीच्या दरबारात साजरा करण्यासाठी राज्यासह परराज्यातून लाखों भाविक पायी तिर्थक्षेञ तुळजापूरात दाखल होत असुन, भाविकांनी तुळजाई नगरी गजबजुन गेली आहे. सोमवार दि. 6 ऑक्टोबर कोजागिरी पोर्णिमा, मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी मंदीर पोर्णिमा या दोन पौर्णिमांचा योगायोग चालून येत असल्याने भाविकांची गर्दी दोन टप्प्यात विभागली जात आहे.  

सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.24 वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असून मंगळवारी 7 ऑक्टोबर सकाळी 9.18 वाजता पौर्णिमा समाप्त होत आहे. मातेची निद्रिस्त मुर्ती सोमवारच्या उत्तररात्री मंगळवारी पहाटे देवीस सिंहासनाधिष्टित केल्यानंतर लगेच चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मातेला पंचामृत अभिषेक सुरू केले जाणार आहेत. यंदा पावसाने ऐन शारदीय नवरात्रौत्सवात धुमाकूळ घातल्याने दहा दिवसात देवी दर्शनासाठी भाविकांची अपेक्षीत गर्दी दिसून आली नाही. ती पोर्णिमेला येण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. मंगळवार पहाटे भाविकांची गर्दी प्रचंड उसळण्याची चिन्हे असून, प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली मातेची पाच दिवसाची श्रम निद्रा येत्या उत्तररात्री मंगळवार पहाटे संपणार आहे. नंतर मुख्य मुर्तीची सिंहासनावर पुर्नप्रतिष्ठापना होवून लगेच मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत. मातेच्या नित्य पूजेची घाट मंगळवारी सकाळी 6 वाजता होऊन मुर्तीला दुसऱ्यांदा पंचामृत अभिषेक करण्यात येणार असुन, नंतर नित्योपचार पुजा केली जाणार आहे. नंतर सांयकाळी देविजीस पुनश्च अभिषेक पुजा केल्यानंतर नित्योपचार पुजा होणार आहे. नंतर मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात येणार आहे. नंतर महंत तुकोजी बुवा यांनी जोगवा मागितल्या नंतर शारदीय नवराञोत्सवाचा सांगता होणार आहे.

 
Top