धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा  श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये रुपामाता विद्यालयाचे तीन विद्यार्थी अभिजीत राजेंद्र पवार, साक्षी गौतम एकंडे, वीर मारुती कदम या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर तुळजाभवानी स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये रूपामाताचे दोन विद्यार्थ्यांची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.

 निवड  झालेल्या  संचिता व्यंकट गुंड, आदित्य सुखलाल गुंड या विद्यार्थ्यांस  जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने उमाकांत मिटकर महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण समिती प्रमुख, यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांचा  शिक्षणविस्तार  अधिकारी  हाके मॅडम व समुद्रवाणी केंद्राचे  केंद्रप्रमुख चाऊस, यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यालयात सत्कार करण्यात आला. हाके मॅडम यांनी  ग्रामीण भागातील शाळा असताना या शाळेचे पाच विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष

ॲड. यंकटराव विश्वनाथ गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी,  धाराशिव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष जावेद शेख, बुद्धिबळचे राष्ट्रीय पंच महादेव भोरे,रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश मनसुळे, मुख्याध्यापक सूर्यवंशी,  क्रीडा शिक्षक शेख बी एम,  बी एस जावळे, गोरे एन के, तंत्रस्नेही शिक्षक यादव एस बी, गावित एन.जे, सचिन सोनकठले, गुंड मॅडम, पवार.आर.बी, दयानंद थोरात, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विभागीय  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top