भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सरकारने पंजाब प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी. जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असे प्रतिपादन हभप शुभम महाराज यांनी आज केले.
तालुक्यातील वसंतगड येथील हभप शुभम महाराज यांनी आज भूम येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषणास बसलेल्या हरिभक्त परायण सतीश कदम महाराज यांची अमर उपोषणाच्या सौच्या दिवशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या योग्य असुन शासनाने कोणत्या मागण्या तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. राज्यासह तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून नेलेल्या असल्याने शेतकरी व्याकुळ झालेला आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या कडे ओढत असून तेव्हा शासनाने पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करावी व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुन्हा चालू कराव्यात यामुळे शेतकरी आत्महत्या पासून परावर्त होऊन पुन्हा शेती करून समाधानी राहील यासाठी प्रयत्न करावेत. अशी शासनाकडे मागणी केली. देशातील उत्तर प्रदेश येथील सरकार कुंभमेळ्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च करते परंतु महाराष्ट्रातील सरकार अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या शेतकऱ्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करते ही किती मोठी तापवत आहे, असे सांगून आपण दुखत सामील असून शेतकरी सुखी तर जग सुखी असे सांगून या उपोषणास आपला पाठिंबा दर्शवून शासनाने कदम महाराजांच्या मागण्याचा विचार करून मागण्या तात्काळ सोडाव्यात अशी मागणी केली. यावेळी महालिंग महाराज सिताराम गड आसाराम साबळे महाराज व माऊली महाराज नागरे हे उपस्थित होते.