धाराशिव (प्रतिनिधी)- ओस्ला ओॲसिस लेडीज फाउंडेशनच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदगुरु श्री दादा रानडे चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली यांच्या वतीने आणि शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ  डॉ. मीना जिंतूरकर यांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत पोहोचविण्यात आली. 

या मदतीतून ढोकीजवळील देवळाली, साकत आणि भवानवाडी (ता. भूम) येथील कुटुंबांना आवश्यक किराणा साहित्य, एक चादर आणि एक पांघरूण अशा 130 किट्सचे वाटप करण्यात आले.  या उपक्रमासाठी डॉ. अनार साळुंके, किरण देशमाने, शशांकी संगवे आणि सुप्रिया दूधभाते (ओस्ला ओॲसिस लेडीज फाउंडेशन) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वाटपाच्या वेळी डॉ. श्रीराम जिंतूरकर, सद्गुरू श्री दादा रानडे चॅरिटेबल ट्रस्ट  डोंबिवलीचे माधव खिस्ती, शेखर पटवर्धन, सौरभ मराठे, तसेच ॲड. जनक पाटील, मीरा ताई मोटे, गिरीश काळे, शहाजी पाटील, समाधान शितोळे आणि अभिजित कदम, डॉ अनार साळुंके,किरण देशमाने उपस्थित होते.

यावेळी किरण देशमाने म्हणाल्या की  दिवाळी सारखा सण अगदी तोंडावर आला आहे. पण आपलीच ही भावंड पूरग्रस्त परिस्थितीमुळे अतिशय संकटात आहेत. त्यामुळे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या ओसलाच्या माध्यमातून अनेकांना मदतीसाठी आवाहन केलं. त्यांनीही तितकाच प्रतिसाद देत आम्हाला मदत केली. आणि मग आम्ही प्रत्यक्षात जाऊन पूरग्रस्तांना मदत पोहोचवली. शाब्दिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा नक्की आनंद आहे.

 
Top