तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथील ‘बालाजी अमाईन्स' उद्योगसंस्थेने मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही धनादेश सुपूर्द करण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूर्वीही बालाजी अमाईन्सच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा संस्थेने सामाजिक जबाबदारी निभावत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही मोठी देणगी दिली आहे. या प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. राम रेड्डी, राजेश्वर रेड्डी, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. बालाजी अमाईन्सच्या या सामाजिक उपक्रमामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार असून उद्योगक्षेत्रातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
