तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सांगवीमार्डी शिवारातील गट नं. 91 मधील शेतजमीन अतिवृष्टीत माझी जमीन वाहुन गेल्यामुळे पंचनामा करुन झालेली नुकसान देण्याची मागणी शेतकरी कल्याण रावजी भोसले यांनी जिल्हधिकारी यांना निवेदन देवुन केली.

सदरील गटामधून कृष्णा मराठवाडा टप्पा क्र.2 साठी माझी जमिन संपादीत होवुन शिल्लक 00 हे 73 आर क्षेत्र मी कसत आहे. अतीवृष्टी झाल्यामुळे पावसाचे पाणी माझ्या शिवारात शिरून माझे शेतातील काळी माती वाहून जावून माझी जमीन खरडा झाली आहे. तरी वरील ठिकाणाचा पंचनामा करुन माझी झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

 
Top