धाराशिव (प्रतिनिधी)- “साहित्य क्षेत्रात तुमच्या भरीव कामामुळे धाराशिवचे नाव जागतिक पातळीवर झाले, तसेच तुमच्या मार्गदर्शनातून नव्या साहित्यिकांची एक फळी तयार झाली असून, साहित्य चळवळीतील आपले योगदान अतिशय मोलाचे आहे“. अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या कार्याबद्दल कृतज्ञभाव व्यक्त करत, राजेंद्र अत्रे यांच्या अमृतमहोत्सवी जीवनाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्यंकटेश महाजन महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. यावेळी मंचावर राजेंद्र अत्रे व त्यांच्या पत्नी सौ. विजयश्री अत्रे, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  मिलिंद जोशी, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन लाखे, डॉ. अभय शहापूरकर, युवराज नळे व संपुर्ण अत्रे कुटूंबीय उपस्थित होते.

यावेळी आमदार विक्रम काळे, मिलिंद जोशी, राजन लाखे यांनी राजेंद्र अत्रे यांच्या साहित्यामधील योगदानाबद्दल कौतुक केले. यावेळी युवराज नळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ईशस्तवन गीत कु. प्रज्ञा अत्रे यांनी सादर केले. त्याला प्रवीण अत्रे यांनी संवादिनीची तर प्रा. योगेश अत्रे यांनी तबल्याची साथ दिली. शेवटी कु. श्रावणी येरबागकार यांनी पसायदान सादर केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केला. तर आभारप्रदर्शन डॉ अभय शहापूरकर यांनी केले.

 
Top