भूम (प्रतिनिधी)- जमीयते उलमा-ए-हिंद धाराशिव (उस्मानाबाद) व भूम शहर च्या वतीने पूरग्रस्त शेतकरी परिवारांना आर्थिक मदत वाटप भूम तालुक्यातील अती पाऊस झाल्याने व नदया पुरागत वाहिल्याने भूम तालुक्यातील नदी कडेच्या राहणाऱ्या व शेती करणाऱ्यांवर आस्मानी संकट आल्याने शेतकऱ्यांची दैनिय अवस्था झाली असून त्यांना जितकी मदत करता येईल ती कमीच असणार आहे. शासनाने आपल्या राज्यात असणारे विवीध पक्ष, संघटना, मंत्री महोदय आमदार,खासदार, दैनिकांच्या रिलीफ फंडातून मदत केली जात आहे. या मध्ये सुधा आपला सामाजिक सहभाग असणे तितकेच महत्आत्वाचं आहे म्हणून जमीयते उलमा-ए-हिंदयांच्या वतीने बेलगाव - पिंपळगाव येथिल पूरग्रस्त लोकांना नुकसानीची दाहकता पाहता रोख रक्कम त्या त्या परिस्थिती नुसार देवून सहकार्य केले आहे.
आणि मुस्लिम बांधवांना या परिस्थीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी समाजातील लोकांनी पुढे यावे व जमीयते उलमा-ए-हिंद च्या माध्यमातून किंवा स्वतःहून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करावी असे आव्हान करण्यात आले आहे. जमीयते उलमा-ए-हिंद भुम तालुका मौलाना साजीद शेख शाही,द्राक्षे बागायतदार फारूक मोगल, हाजी साजीद बागवान सरपंच कोहिनूर सय्यद सर शेतकरी बांधव उपस्थित होते.