भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती होऊन शेतकऱ्यांचे घरदारे वाहून गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आल्यामुळे बेलगाव (पिंपळगाव) ता. भूम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी किराणा साहित्य साखर, डाळ, गहू, तेल,तूप, मीठ, धान्य, व इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले.
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ,खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील,जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, महिला जिल्हा संघटक तथा सरपंच जिनत सय्यद ,भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील ,उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे,श्री दिलीप शाळू विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे ,जिल्हा संघटक भगवान बांगर महिला तालुका संघटक उमा रणदिवे ,विहंग कदम,दिपक मुळे,विनायक नाईकवाडी,कोहिनूर सय्यद , बुद्धिमान लटके बुद्धिवान घोडगे ,उमेश परदेशी तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते हा उपक्रम महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, स्थानिक लोकाधिकार समिती, आणि जाणीव ट्रस्ट यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जाणीव सेवाभावी संस्थेचे दिलीप जाधव, प्रकाश शिरवाडकर, दिलीप बाळासाहेब साटम, संजय ढोलम, दत्ता भोसले, मधुकर घाडी, महेश दूरी, संजय भांबोरे, शरद शेट्ये उपस्थित होते.