धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकयांचे शेती कर्ज माफी द्यावी तसेच हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.17) सकाळी 11 वा. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी काळी दिवाळी साजरी करत आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिली.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की, सरकारने मदतीचा आकडा सांगितला आहे. प्रत्यक्षात होणाया मदतीमध्ये तफावत असल्याने शेतकयांची फसवूण झालेली आहे. शेतकयांची फसवणूक न करता त्यांना तातडीने शेती कर्ज माफ करावे. तसेच हेक्टरी 50 हजाराचे अनुदान द्यावे, विना अटी-शर्थीने संपूर्ण पिकविमा मिळावा, सोसाबीनची शासकीय खरेदी ताबडतोब करुन भावांतर योजना लागू करावी, अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीबाबत व विहीरीतील गाळ काढण्याच्या किचकट अटी रद्द कराव्यात. शेतकऱ्यांच्या या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी पोहंचवाव्यात यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.17) सकाळी 11 वा. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी काळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

 
Top