नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील नगर पालिकेचे नगराध्यक्ष्‌‍ पद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले असल्याने शहरातील सर्वच पक्षाचे मातंबर मंडळी आता पासूनच नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविण्यासाठी बांशींग बांधुन तयार झाले आहेत. दरम्यान खुल्या प्रवर्गासाठी हे नगराध्यक्ष पद सुटले असल्याने या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. त्यामुळे नळदुर्गचे भूमीपूत्र अशोक जगदाळे, माजी नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे येणारी निवडणुक ही चुरशीची होणार यामध्ये शंका नाही.

दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडती पार पडल्या. यामध्ये नळदुर्गचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. दरम्यान सन 2006 मध्ये उदय जगदाळे यांच्या रुपाने सर्वसाधारण गटातील नगराध्यक्ष म्हणून ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यानंतर सुमारे 18 वर्षानंतर पून्हा एकदा आता नळदुर्गचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुले गटासाठी सुटले आसल्याने शहरातील मातंबर मंडळी या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान खुल्या प्रवर्गासाठी हे नगराध्यक्ष पद सुटल्याने या निवडणुकीत चुरश निर्माण होणार आहे. त्यामुळे नळदुर्गचे भूमीपूत्र अशोक जगदाळे हे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उतरण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांनी सन 2019 मध्ये तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवून सुमारे 35 हजार मतदान पहिल्याच झटक्यात घेतल्याने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. तर सन 2016 मध्ये येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसाधरण महीला गटातून त्यांनी त्यांची बहीण श्रमीती रेखाताई जगदाळे यांना जनतेतुन निवडून आणून नगराध्यक्षपदी विराजमान केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे राजकारणाचा चांगला अनुभव आहे. तर भाजपा कडून भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक बसवराज धरणे व माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार हे ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बसवराज धरणे हे युवक असल्याने त्यांचा शहरातील सर्वच जाती धर्मात चांगला जनसंपर्क असलेले एक युवक नेतृत्व पुढे येत आहे, तर गेल्या तीन ते चार पंचवार्षिक निवडणुकीत सतत नगरसेवक म्हणून निवडून आलेले नय्यर जहागिरदार हे ही राजकारणाचा चांगला अनुभव असलेले नेतृत्व आहे. तर काँग्रेसकडून प्रबळ दावेदार म्हणून गेल्या पंचेवीस वर्षापासून सतत नगरासेवक व एक वर्ष नगराध्यक्ष पद भोगलेले शहेबाज काझी हे ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे ही येणारी पालिकेची निवडणुक मोठी चुरशीची होणार आहे. तर यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्याच बरोबर एमआयएम यांनी आपला पत्ता खोलला नसला तरी एैन वेळी ते कोणती भुमीका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे. कारण त्यांचा पत्ता आजून ही गुलदस्त्यातच आहे, त्यामुळे येणारी पालिकेची नगराध्यक्ष पदाची ही निवडणुक मतदारांसाठी पर्वणीच ठरणारी आहे.

 
Top