धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवप्रवेशित  विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि दीक्षारंभ-2025 हा शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व प्रमुख पाहुणे उद्योजक अशोक सपकाळ, उद्योजक अमित भराटे, सीए इंद्रजीत आखाड़े यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचा उपयोग उद्योजकता विकासाकारिता करावा असे आवाहन करून विविध विषयावर मार्गदर्शन केले.  विद्या शाखाप्रमुख प्रा. नवनाथ मुंडे यांनी बदलती कृषी पदवी शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली तसेच महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रगती अधोरेखित केली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ.अमित गांधले, डॉ.  मोहसीन शेख, विद्या शाखाप्रमुख प्रा. नवनाथ मुंडे,परीक्षा विभाग प्रमुख प्रा. प्रवीण माळी, प्रा. पाटील एस. एन. प्रा. आकाश डोके, प्रा. शेटे डी.एस. प्रा. दळवे एस. ए., प्रा. शिंदे ए. एस., प्रा. भालेकर एस. व्ही., प्रा. सोन्ने ए. एस. प्रा. गोटे पी. पी. डॉ. खोसे पी. जे., डॉ. घोडके पी.  डी. महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. घाडगे एच. एस., प्रा. सुतार आर. व्ही.प्रा. कांबळे ए.बी, महबूब मुजावर, श्रीमती कोरे मावशी, संदीप वीर, आकाश गिरी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय सत्राचे विद्यार्थी श्री. साठे शुभम, गरड सिद्धी, जाधवर मीरा आणि गौरव स्वामी  यांनी केले तर आभार डॉ. रोहित इंगळे यांनी मानले.

 
Top