धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाच्या मार्फत “उडान मॅनेजमेंट फेस्टिवलचे आयोजन  दिनांक 9 आणि 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या फेस्टिवल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

कार्पोरेटच्या धर्तीवरती एखादा कर्मचारी जेव्हा कंपनीमध्ये रुजू होतो तेव्हा त्याला कंपनीचे व्हिजन, ध्येयधोरण आणि इतर बाबींची ओळख करून दिली जाते त्याच पद्धतीने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी “इंडक्शन” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभागाचे पुढील “व्हिजन” आणि विद्यार्थ्यांचे “व्हिजन” याचा समन्वय साधून पुढील कालावधीत “करिअरचे नियोजन” करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  विभागाचा आत्तापर्यंतचा प्रवास त्यासोबतच विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठीच्या सेवा-सुविधा याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव हे होते. सरांनी विभागाचे पुढील दोन वर्षाचे “नियोजन आणि विद्यार्थ्यांचे यामधील स्थान”  यावरती मार्गदर्शन केले.  त्यासोबतच अभ्यासक्रम, स्कील, इंडस्ट्री अशा ईतर विविध बाबीवरती कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन बस्सैये, डॉ. विक्रम शिंदे आणि प्रा. वरूनराज कळसे यांनी मार्गदर्शन केले.  

स्पर्धेत अनुजा बाभळे आणि अजित लांडगे यांची निवड करण्यात आली आणि सामोरोप समारंभात त्यांना पुरस्कारीत करण्यात आले. सदर फेस्टिवल हा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी,  प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे,  कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर  आणि उपपरिसर संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.  सदर फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाची योगदान दिले.

 
Top