धाराशिव (प्रतिनिधि)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दि. 03/10/2025 रोजी अभिजात मराठी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून श्रीमती कांचन जाधव (माळी) नायब तहसिलदार धाराशिव, माळी निलेश हणमंत निरीक्षक अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त विजय गायकवाड, ॲड. अजित कांबळे, श्रीमती काशीद मॅडम हे होते.

यावेळी प्रमुख पाहूण्या श्रीमती कांचन जाधव यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापूर उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात दर्जा दिल्यामुळे मराठी भाषेचा सन्मान झाला आहे. यामुळे युवकांसाठी सर्वांसाठी मराठी भाषेचे नवे दालन खुले झाले आहे. पुढील काळात आपण सर्वांनी मराठी भाषा विकसित होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल राठोड यांनी केले.यावेळी प्रमोद जगताप, शाम भणगे, उमेश इंगळे, कोळगे, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, वाचक उपस्थित होते.

 
Top