धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात  माहे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकाचे नुकसान प्रचंड झाले आहे. याचबरोबर अनेक गावामध्ये घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची जनावरे पुरामध्ये वाहून गेले असून जिल्हाभरात नद्यांनी पुर पातळी ओलाढल्याने नदीकडेच्या जमीनी खरडुन गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आढावा बैठकीचे करणेबाबत जिल्हाधिकारी, धाराशिव यांना सुचीत केले आहे. सदर बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, धाराशिव येथे दि. 10 ऑक्टोबर  रोजी दु. 04.00 वा. घेण्यात येणार आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, मृद व जलसंधारण, सर्व तालुका पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, सर्व तालुक्याचे  तहसीलदार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे प्रतिनिधी, तसेच संबंधित अधिकारी यांना हजर राहणेबाबत सुचना केल्या आहेत. या बैठकीस पत्रकार या नात्याने पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 
Top