धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून यंदाच्या द्वितीय गाळप हंगामात अडवा पडलेल्या उसाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांनी ग्रीनटेक कारखान्याच्या अग्नी प्रदीपन कार्यक्रमात सांगितले. कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लि.च्या या श्रीसिद्धीविनायक परिवारातील दुसऱ्या युनिटच्या द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी मातोश्री मीनाताई काशिनाथराव कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करून करण्यात आले. या वेळी श्रीसिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी, संदीप पाटील, एकनाथ धर्माधिकारी, बालाजी कोरे, ॲग्रीटेकचे एमडी दिनेश कुलकर्णी, ग्रीनटेकचे एमडी गणेश कामटे, मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जाधव, श्री सिद्धीविनायक डिस्ट्रिक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास कुलकर्णी, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, नकुल कुलकर्णी, प्रथमेश आवटे, बलराम कुलकर्णी, विकास उबाळे, अभय शिंदे, बालाजी जमाले, शुभम मेंढे, अमित गायकवाड, महादेव फुलारी, गजानन पाटील, संजीव चीलवंत यांच्यासह कारखाना खातेप्रमुख,वाहनचालक, कर्मचारी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान द्वितीय गाळप हंगाम म्हणजेच यावर्षीपासून गुळ पावडर बरोबरच खांडसरी साखर उत्पादन सुरू करण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी यंदाचा हंगाम अधिक उत्पादनक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

 
Top