भुम (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी दुधाला आधारभूत हमीभाव द्यावा यास इतर मागण्यासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या हभप सतीश कदम महाराज यांची आणि कृषिमंत्री भरणे यांच्याशी हभप प्रकाश बोधले महाराज यांनी मध्यस्थी करून आज उपोषणाची सांगता झाली.
गेल्या सात दिवसापासून भुम येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तालुक्यातील आष्टा येथील हभप सतीश कदम महाराज हे आमरण उपोषणास बसलेले होत. या सात दिवसाच्या कालावधीत राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापासून वारकरी संप्रदायातील हभप विशाल खोले महाराज यांच्यासह अनेक लोकांनी उपोषणास भेटी देऊन महाराजांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता. अखेर आज हभप प्रकाश बोधले महाराज यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याबरोबर दूरध्वनीद्वारे कदम महाराज यांच्याशी चर्चा घडवून आणून या आंदोलनाबाबत मार्ग काढण्याचे ठरवून प्रत्यक्ष बोलून या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री भरणे आणि कदम महाराज यांच्या चर्चा होऊन ज्यावेळी राज्यात कर्जमुक्ती होईल त्यावेळेस सरसकट कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला जाईल व शेतकऱ्याच्या दुधाबाबत हमीभाव निश्चित केला जाईल यासह अनेक मागण्यावरती सकारात्मकपणे चर्चा होऊन या उपोषणास आज सांगता करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे,तहसीलदार जयवंत पाटील,ॲड. विलास पवार, विठ्ठल बाराते,सुशेन जाधव, धनंजय सावंत, अरुण काकडे, तात्यासाहेब अष्टेकर ,राजकुमार घरत ,उद्धव राजे सस्ते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. अखेरीस वारकरी संप्रदाय ची शिष्टाई पुण्याला आली.