तुळजापूर (प्रतिनिधी)-  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलची विद्यार्थिनी अंजली राहुल माने हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरत तुळजापूरचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे.

लातूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, शिवणी येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत लातूर, नांदेड, धाराशिव आणि महानगरपालिका विभागांमधून तब्बल 130 स्पर्धक सहभागी झाले होते. 19 वर्षे वयोगटातील 72 किलो वजन गटात अंजली मानेने विभागात प्रथम क्रमांक मिळवत थेट राज्यस्तरावर मजल मारली. तसेच 62 किलो वजन गटात अक्षरा विश्राम घुगेने द्वितीय क्रमांक मिळवला, तर 53 किलो गटात भक्ती विवेक बागलने तृतीय स्थान पटकावले. विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. मुंडे, पर्यवेक्षक पी. बी. क्षीरसागर, तसेच शिक्षकवर्गातील हुंडेकरी, कुंभार, गुळवे, घोरपडे, घोडके, खराटे, क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक एल. एल. आदटराव यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top