भुम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये तालुका विधी सेवा समिती तालुका वकील संघाच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान भगवान पंडित न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय भूम, प्रमुख अतिथी ॲड .पंडितराव ढगे, अध्यक्ष तालुका वकील संघ, ॲड.शब्बीर सय्यद सचिव भूम तालुका वकील संघ, हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव भोसले, संस्थेचे सचिव तथा पर्यवेक्षक सतीश देशमुख, किरण जाधव, चंद्रकांत तांबे, पल्लवी नवगिरे, विठ्ठल दहिटणेकर, सूत्रसंचालन पोपट बांगर यांनी केले. न्यायाधीश यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामध्ये पोक्सो कायद्यासंदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त अवलंबावी आपल्याला देशाला महासत्ताक बनवायचे आहे. तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी बळकटी दिली पाहिजे. देशात संविधान कायद्यापेक्षा कोणीही मोठी नाही कायदा हा सर्वांसाठी समान आहे यासंदर्भात साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीयगीत वंदे मातरम या गीतांनी केला.